हृतिक रोशनची प्रमुख भूमिका असलेल्या मोहेंजोदारो या चित्रपटाचा मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाद्वारे पूजा हेगडे ही बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. पूजाने २००९ साली झालेल्या मिस इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला होता.
ब्रिटीशांचे राज्य, मुघल, ख्रिस्ती, अलेक्झांडर येण्यापूर्वी भारत देश हा मोहेंजोदारो या प्राचीन संस्कृतीसाठी ओळखला जातो. हेच मोहेंजोदारो या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये दाखविण्यात आलेयं. हा चित्रपट तयार करण्यासाठी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यास तीन वर्षांचा कालावधी लागला. त्याविषयी बोलताना आशुतोष म्हणाला की, मी स्वतःहून आधी अभ्यास करतो. मला ज्या विषयावर चित्रपट करायचा आहे त्यासंदर्भातील पुस्तक मी वाचतो आणि त्या काळास समजून घेण्याचा प्रयत्न करतो. यासाठी बराचं वेळ लागतो पण त्यामुळे तुम्ही चांगले तयार होता. भुज आणि पुणे येथे या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आलेयं.
अक्षय कुमारच्या रुस्तम या चित्रपटासोबत मोहेंजोदारो हा चित्रपट १२ ऑगस्टला प्रदर्शित होईल.

Story img Loader