ह्रतिक रोशन हा त्याच्या अभिनयासोबतच डान्स आणि फिटनेससाठी ओळखला जातो. ह्रतिकच्या फिट बॉडीवर अनेकजण फिदा आहेत. या फिट बॉडीसाठी तो अनेक तास जिममध्ये मोठी मेहनत घेत असतो. नुकताच त्याचा जिममधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र ह्रतिकचा व्हायरल झालेला जिममधील हा व्हिडीओ त्याच्या वर्कआउटचा नसून त्याच्या डान्सचा आहे. होय जिममध्ये वर्कआउट करत असतानात काही जुनी गाणी कानावर पडताच ह्रतिकला डान्स करण्याचा मोह आवरला नाही आणि त्याने थेट गरबा सुरु केला.
ह्रतिक रोशनने त्याच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर जिममधील काही व्हिडीओ शेअर केले आहेत. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये तो म्हणाला, “जेव्हा एखादा बॉलिवूड हिरो जिममध्ये अचानक ८०च्या दशकातील गाणी ऐकतो”. यातील पहिल्या व्हिड़ीओत ह्रतिक गरबा खेळताना दिसतोय. तर पुढे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातील ‘जानू मेरी जान’ या गाण्यावर त्याने ठेका धरला आहे. तर शेवटच्या व्हिडीओत तो मिथुन चक्रवर्ती यांच्या ‘जिमी जिमी आजा आजा’ या गाण्यावर डान्स करत आहे. ह्रतिकच्या या व्हिडीओजना चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी पसंती दिलीय.
अखेर दोन दशकांनंतर पाहायला मिळणार तारासिंह आणि सकिनाची प्रेमकथा, सनी देओलने केली ‘गदर २’ ची घोषणा
व्हिडीओवर आयुष्मान खुराना, क्रिती सेनॉन, रणवीर सिंहसर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. अभिनेता वरुण धवनने कमेंट करत त्याला डान्स आवडल्याचं म्हंटंलंय. तर दीपिका पदूकोणने ‘जोकर’ अशी कमेंट केली आहे.
“अनेक देशात गांजाचं सेवन कायदेशीर, आपल्याच इथे…”; आर्यन खानच्या अटकेवर हंसल मेहतांच वादग्रस्त विधान
ह्रतिक रोशन लवकरच दाक्षिणात्या सुपरहिट सिनेमा विक्रम वेधाच्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार आहे. या सिनेमाचं शूटिंग त्याने सुरु केलंय. तसचं ‘क्रिश ४’ या सिनेमातही ह्रतिक पुन्हा दमदार अंदाजात झळकणार आहे.