बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान क्रूझवर ड्रग्ज पार्टी केल्याच्या आरोपावरून शनिवार, २ ऑक्टोबरपासून एनसीबीच्या ताब्यात आहे. आज आर्यनची कोठडी संपणार असल्यामुळे त्याला मुंबईतील न्यायालयात हजर करण्यात आले होते. आर्यनच्या वकीलांनी पुन्हा एकदा जामीन याचिका दाखल केली होती. मात्र यावर एनसीबीने ११ ऑक्टोंबर पर्यंत कोठडी मागितली आहे. दरम्यान अनेक बॉलिवूड कलाकारांनी ट्वीट करत आर्यनला पाठिंबा दिला. अभिनेता हृतिक रोशनने देखील आर्यनसाठी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. ती पोस्ट पासून अभिनेत्री कंगना रणौतने अप्रत्यक्षपणे हृतिकला सुनावले आहे.

कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक पोस्ट शेअर केली आहे. ‘आता सगळे माफिया पप्पू आर्यन खानला पाठिंबा देतील. आपण चूका करतो हे अभिमानाने सांगू नये. मला आशा आहे की या सर्व गोष्टींमुळे आर्यनला एक दिशा मिळेल. त्यासोबतच त्याने केलेल्या कृतीची त्याला जाणीव देखील होईल. आर्यनच्या विरोधात जे पाऊल उचलले जात आहे त्यातून त्याला धडा मिळेल. मला आशा आहे की जेव्हा तो तेथून बाहेर पडेल तेव्हा एक चांगला व्यक्ती असेल. चांगल्या गोष्टी तेव्हाच होतात जेव्हा आपण एखाद्या विषयी बोलणे बंद करतो’ या आशयाची पोस्ट कंगनाने केली आहे.

आणखी वाचा : ‘एनसीबी अधिकाऱ्यांनी मुलांना चांगली वागणूक दिली’, आर्यन खानचा मित्र अरबाज मर्चंटच्या वडिलांचा खुलासा

कंगनाने पोस्ट करण्याच्या काही वेळ आधी हृतिकने पोस्ट करत आर्यनला पाठिंबा दिला होता. पोस्टमध्ये ‘माझा प्रिय आर्यन, जीवन हा एक विचित्र प्रवास आहे. कारण अनेक गोष्टी या अनिश्चित असतात. ईश्वर फार दयाळू आहे. तो कणखर व्यक्तींनाच कठीण चेंडू खेळण्याची संधी देतो’ असे म्हणत ऋतिकने संयमी आणि एखाद्या कठीण परिस्थितीचा सामना करण्याची हिंमत दाखवणाऱ्यांवरच असा प्रसंग येतो असे सांगण्याचा प्रयत्न केला होता.

Story img Loader