हृतिक रोशनने बॉलीवूडमध्ये ‘कहो ना प्याह है’ चित्रपटाने पदार्पण केल्यानंतर लगेचच तो सुझान खानसोबत लग्नबंधनात अडकला. मात्र, काही दिवसांपासून हृतिक आणि सुझानचा घटस्फोट होणार असल्याची बातमी आहे. पण, हे दोघेही एकमेकांवर प्रेम करतात आणि त्यांच्यात सर्व सुरळित चालले आहे. तसेच, त्यांचा घटस्फोट होणार असे सुझानची बहिण फराह खान अली हिने म्हटले आहे. सेलिब्रिटींवर नेहमीच गॉसिप केले जाते. तुम्ही जे वाचता त्यावर विश्वास ठेवू नका. त्या दोघांना त्यांचे वैयक्तिक आयुष्य जगू दे, असे फराहने ट्विट केले आहे.
सुझान आणि हृतिक यांचे २००० साली लग्न झाले. सुझान आणि हृतिक एकमेकांना आधीपासूनच ओळखायचे. लग्नानंतरही त्यांचं चांगलं पटत होते आणि त्यांना दोन मुलही आहेत. मात्र, काही दिवसांपासून या दोघांमध्ये खटके उडत असल्याची चर्चा आहे.

Story img Loader