आपल्या प्रत्येक नव्या चित्रपटात काहीतरी नविन शिकण्याची वृत्ती ठेवणारा अभिनेता ऋतिक रोशन सध्या वाघाशी दोन हात करण्याचे प्रशिक्षण घेत आहे. आशुतोष गोवारीकर यांच्या आगामी ‘मोहंजो दडो’ चित्रपटात ऋतिक रोशनचे वाघाशी सामना करतानाचे  दृश्य चित्रीत करण्यात येणार आहेत. अशाप्रकारच्या दृश्यांसाठी आवश्यक असलेली शरीरयष्टी बनविण्याचे प्रशिक्षण ऋतिकला देत असल्याची माहीती सेलिब्रिटी फिटनेस प्रशिक्षक सत्यजित चौरसियाकडून यांनी एका मुलाखती दरम्यान दिली.
ऋतिकला व्यायामाची आवड असून व्यायाम हे ऋतिकसाठी ताण नष्ट करणारे औषधासारखे आहे. व्यायामातून ऋतिकला आनंद मिळतो. त्यामुळे ऋतिकला आनंदी राखण्यासाठी व्यायामाच्या काही उपयोगी टीप्स देऊ केल्या असल्याचेही चौरसिया पुढे म्हणाले. मोहंजो दडोसाठी ऋतिक भरपूर मेहनत घेत असून आपली शरीरयष्टी चित्रपटात सुयोग्य दिसावी यादृष्टीनेही प्रयत्न करत आहे.
सत्यजित चौरसिया हे अनेक सेलिब्रेटींचे व्यायाम प्रशिक्षक राहिले आहेत. ‘गजनी’ चित्रपटातील ‘एट पॅक अॅब्स’ लूकचे श्रेय  चौरसिया यांना जाते.

Story img Loader