बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशनला आज (गुरुवारी) रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. रविवारी त्याच्या मेंदूवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेद्वारे त्याच्या मेंदूत दोन महिन्यांपासून असलेली गाठ काढण्यात आली. हृतिकची प्रकृती उत्तम असल्याचे हिंदूजा रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले. मात्र, डॉक्टरांनी त्याला चार आठवडे आराम करण्याचा सल्ला दिला आहे. दोन महिन्यांपूर्वी ‘बँग बँग’ चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी हृतिकच्या डोक्याला आघात झाला होता. तेव्हापासून तो डोकेदुखीच्या त्रासाने त्रस्त होता. मात्र, या शस्त्रक्रियेनंतर बरे वाटल्यावर हृतिक पुन्हा ‘बँग बँग’ चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी परदेशी रवाना होणार आहे.

Story img Loader