हृतिक रोशन आपल्या आगामी ‘काबिल’ या चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. ‘काबिल’ या चित्रपटपटात हृतिक अंध व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार असून त्यासाठीच त्याने अंध व्यक्तींची भेट घेण्याचे ठरवले आहे. अंध व्यक्तींच्या देहबोलीचे निरीक्षण करुन आपल्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न हृतिक करणार आहे.
हृतिक रोशन पुढील आठवड्यात अंध व्यक्तींची भेट घेउन संवाद साधण्यास उत्सुक असल्याचे हृतिकच्या प्रवक्त्याने सांगितले. ‘काबिल’ हा चित्रपट संजय गुप्ता यांनी दिग्दर्शित केला असून जानेवारी २०१७ मध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकतेच अभिनेता हृतिक रोशनने आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘मोहेंजोदडो’ या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केले.

Story img Loader