अभिनेता हृतिक रोशन ‘बँग बँग’ या त्याच्या आगामी चित्रपटात स्वत: हाणामारीची थरारक दृ्श्ये साकारणार आहे. अलिकडेच हृतिकच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याने ‘बँग बँग’ चित्रपटातील हाणामारीच्या दृश्यांसाठी स्टंट मॅनचा वापर केला जाणार असल्याचे वृत्त होते. परंतु, स्टंट मॅनचा वापर करून साकारण्यात आलेली हाणामारीची दृश्ये न आवडल्याने हृतिकने स्वत:च ही दृश्ये साकारण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी चित्रीकरणाच्या ठिकाणी स्टंट मॅन सतत उपलब्ध ठेवण्यात येणार आहे. या चित्रपटातील हाणामारीची दृश्ये ही ‘स्पायडर मॅन २’ चित्रपटासाठी अॅक्शन स्टंट डिझाईन करणाऱ्या अॅण्डी आर्मस्ट्राँग याची असल्याचे सुत्रांकडून समजले. या चित्रपटात कतरिना कैफ ही हृतिकची नायिका आहे.

Story img Loader