बॉलीवूड सुपरस्टार ऋतिक रोशन याने आपल्या बहुचर्चित सुपरहिरो चित्रपटाच्या श्रेणीतील ‘क्रिश-३’ या चित्रपटाच्या प्रोमोचे आज सोशन नेटवर्कींग साईटवर अनावरण केले.

२००६ साली आलेल्या ‘क्रिश’ या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये सुपरहिरोचा लूक कसा असेल याची ऋतिकच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली होती. विज्ञान तंत्रज्ञानावर आधारीत या चित्रपटाच्या डिजिटल पोस्टरच्या अनावरणापूर्वी ऋतिक रोशनने चाहत्यांसोबत व्हिडिओ चॅटद्वारे संवाद साधला.

याआधी अनावरण झालेल्या पोस्टरमध्ये चाहत्यांना फक्त सुपरहिरोची झलक पहायला मिळाली होती. मात्र नव्याने अनावरण करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये एका बाजूने चेह-यावर मास्क चढवलेला ऋतिक दिसत असल्याने दाखवून उत्सुकता अधिक वाढवण्यात आली आहे.
ऋतिकचे वडिल आणि निर्माते, दिग्दर्शक राकेश रोशन शाहरूख खान आणि दीपिका पदुकोन यांच्यासोबत ‘क्रिश-३’ च्या ट्रेलरचे अनावरण करणार आहेत. या दोघांच्या प्रमुख भूमिका असेलेला चेन्नई एक्स्प्रेस हा चित्रपट ८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. 

राकेश रोशन दिग्दर्शित आणि निर्मित ‘क्रिश-३’ या चित्रपटात प्रियांका चोप्रा, कंगना राणावत, विवेक ओबेरॉय आणि शरयू चौहान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Story img Loader