मागील वर्षी ह्रतिक रोशन आणि सुझॅन या पती-पत्नींनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज(बुधवार) सुझॅनने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.
गेली १७ वर्षांपासूनचे नाते संपविण्याचे पाऊल उचलत ह्रतिक-सुझॅन वांद्रे येथील न्यायालयात घटस्फोटा संदर्भातील कागदपत्रे दाखल करण्यासाठी दाखल झाले. अर्ज दाखल करण्यासाठी दोघेही व्यक्तीश: उपस्थित होते. प्रकरणाची पुढील प्रक्रिया दोघांच्या संमतीनेच होत असल्याचेही समजते. तसेच लवकरच हे प्रकरण न्यायप्रविष्ट होणार असून येत्या काही महिन्यांत प्रकरण निकालात लाघण्याची शक्यता आहे.
अगदी बालपणापासून एकमेकांना ओळखत असणाऱया या जोडीचा २००० साली विवाह झाला होता. त्यानंतर मागीवर्षी १४ डिसेंबर रोजी सुझॅनच्या विभक्त होण्याच्या निर्णयावरून चाहत्यांना धक्का बसला होता. माझ्या पत्नीने १७ वर्षांचे नाते तोडण्याचे ठरविले असल्याचे सांगत सुझॅनच्या निर्णयावर ह्रतिकने दिलेल्या प्रतिक्रियेने दोघांचे खरेच बिनसले असून दोघेही घटस्फोटाच्या तयारीत असल्यावर शिक्कमोर्तब झाले होते. त्यानंतर मध्येच ह्रतिक-सुझॅन पुन्हा एकत्र येणार? असल्याच्या चर्चेनेही जोर धरला होता. परंतु, पुन्हा एकत्र येणाच्या अशाप्रकारच्या सर्व चर्चा पुसून टाकत दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.
आमच्या विभक्त होण्याचा कुणाला दोष देता येणार नाही! – सुझॅन रोशन
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा