नुकताच मेंदूच्या शस्त्रक्रियेला सामोरा गेलेला बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन सध्या कविता करण्यामध्ये व्यस्त आहे. डॉक्टरांनी संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला असल्यामुळे हृतिक त्याचा वेळ कविता करण्यात घालवत आहे.
हृतिकने अलिकडेच त्याच्या फेसबुक पेजवर लिहिलेल्या कवितांपैकी दोन कविता प्रसिध्द केल्या असून, त्या कवितांचा विषय हृतिकच्या मेंदूवरिल शस्त्रक्रिया आणि प्रकृतीमधील सुधारणेसाठी त्याने केलेला संघर्ष हा आहे.
“डोळे ताऱ्यांकडे रोखले आहेत…पाय मात्र, जमीनीवर…मी घरामध्ये कोंडला गेलोय…रक्ताची गुठळी जरी निघाली…मोठी किंमत मात्र, मी मोजली…त्यामुळं मी अंथरूणाला जखडून आहे… चार आठवडे ते म्हणाले…,” अशा आशयाची कविता हृतिकने त्याच्या फेसबुक पेजवर प्रसिध्द केली आहे.
हृतिकच्या चाहत्यांनी फेसबुकवर त्याच्या कवितांना ‘लाईक’ करत आराम करून परत येताना एक ‘प्रेरणादायी’ काव्यसंग्रह प्रसिध्द करण्याची विनंती केली आहे.
कवी मनाच्या हृतिकची त्याच्या ‘जखमे’वर कविता
नुकताच मेंदूच्या शस्त्रक्रियेला सामोरा गेलेला बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन सध्या कविता करण्यामध्ये व्यस्त आहे. डॉक्टरांनी संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला असल्यामुळे हृतिक त्याचा वेळ कविता करण्यात घालवत आहे.
First published on: 17-07-2013 at 05:21 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hrithik roshan writes poem on his injury