अभिनेता हृतिक रोशन सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘सुपर ३०’मध्ये व्यग्र आहे. अनेक वादांना सामोरे जात तब्बल दोन वर्षानंतर या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हृतिकच्या दमदार अभिनयाची झलक या ट्रेलरमधून पाहायला मिळतेय. ‘सुपर ३०’ या चित्रपटात हृतिक आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांची भूमिका साकारणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सगळेच सुपरहिरो कोट घालत नाहीत. कल्पना देशाला घडवतात व माणसांनी देश सक्षम होतो. भारतातील अशाच एका व्यक्तिमत्त्वाची ही कथा’ असे म्हणत हृतिकने ट्विटरवर ट्रेलरची लिंक शेअर केली आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चित्रपटाबाबत अनेक मिम्स व्हायरल झाले आहेत. ‘इतना गलत केंसे हो सकता है भाई, राजा का बेटा राजा नही बनेगा तो क्या बनेगा’ अशा अनेक मिम्समधून नेटकऱ्यांनी हृतिकची खिल्ली उडवली आहे.

https://twitter.com/sleepoholic_hun/status/1135829180556255232

‘सुपर ३०’ चित्रपटाच्या ट्रेलरमधून असे दिसून येते की, आनंद कुमार यांच्या अफाट बुद्धिमत्तेची, सातत्याची, त्यागाची,कठोर मेहनतीची ही गोष्ट आहे. ही केवळ एका गणितज्ञाची सामान्य कथा नसून, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलांना शिकवण्यासाठी समाजातील श्रीमंत माणसांशी वैर पत्करणाऱ्या शिक्षकाची असामान्य कथा आहे. ‘अब राजा का बेटा राजा नही बनेगा, राजा वो बनेगा जो हकदार होगा’ असं म्हणत हृतिक विद्यार्थांना शिकण्यासाठी प्रेरणा देतो.

या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धूरा विकास बहल यांच्या हाती आहे. आनंद कुमार हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी या चित्रपटात दाखवण्यात याव्यात असे दिग्दर्शक विकास बहल यांना वाटत होते. त्या गोष्टी ट्रेलरमधून योग्य पद्धतीने दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. ट्रेलर बघितल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता नक्कीच वाढणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hritik roshan movie super 30 memes viral