‘फुलपाखरु’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. या मालिकेतील तिच्या भूमिकेने अनेकांची मने जिंकली. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. चाहते सतत हृताच्या खासगी आयुष्या विषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. आता हृताने सोशल मीडियावर फोटो शेअर करत प्रेमाची कबूली दिली आहे. तिने शेअर केलेला फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हृता ही टीव्ही दिग्दर्शक प्रतीक शाहला डेट करत आहे. प्रतीकसोबतचा फोटो शेअर करत तिने प्रेमाची कबुली दिली आहे. या फोटोमध्ये ते दोघेही एकमेकांकडे बघत आहेत. दरम्यान हृताने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. सध्या त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. फोटो शेअर करत तिने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
आणखी वाचा : ‘जय भीम’मधील अभिनयाने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणण्याऱ्या ‘संगिनी’ विषयी जाणून घ्या

हृताच्या या पोस्टवर अभिनेत्री प्रिया बापटने कमेंट करत ‘जलवा’ असे म्हटले आहे. तर रसिका सुनीलनने अभिनंदन असे म्हटले आहे. सध्या हृताच्या या पोस्टवर कलाकारांपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वांनीच शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

हृता सध्या ‘मन उडू उडू झालं’ मालिकेत दिपूची भूमिका साकारताना दिसत आहे. तर प्रतीकने काही मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. त्याने बेहद २, बहू बेगम, कुछ रंग प्यार के ऐसे भी, तेरी मेरी एक जिंदड़ी मालिकांसाठी काम केले आहे.