छोट्या पडद्यावरील ‘फुलपाखरु’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून ऋता दुर्गुळेला ओळखलं जाते. हृताने ‘फुलपाखरु’ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली. ती नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अशी तिची ओळख आहे.‘अनन्या’, ‘टाईमपास ३’ या दोन्ही चित्रपटांमुळे ती अजूनही प्रसिद्धीझोतात आहे. नुकतीच ऋता दुर्गुळेने झी मराठीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी ती या मंचावर मंगळगौर खेळली आणि भन्नाट उखाणाही घेतला.
झी मराठीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमात आतापर्यंत अनेक कलाकारासह राजकीय क्षेत्रातील आघाडीच्या महिला नेत्यांनी हजेरी लावली आहे. त्यानंतर अलिकडेच अभिनेत्री ऋता दुगुळेने तिच्या सासूबाई मुग्धा शाह यांच्यासह हजेरी लावली होती. यावेळी तिने या मंचावर मंगळागौर खेळतानाच नवऱ्यासाठी भन्नाट उखाणा घेतला. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
आणखी वाचा-आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ ऑस्करच्या शर्यतीत?
ऋता दुर्गुळेचा हा व्हिडीओ झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये काही बायका ऋता दुर्गुळेला मंगळागौर खेळल्यानंतर उखाणा घेण्याचा आग्रह करतात. सुरुवातीला ती नकार देते पण नंतर तिच्या उखाण्यावर कोणीही हसणार नाही या अटीवर उखाणा घ्यायला तयार होते. या व्हिडीओमध्ये हृता उखाणा घेताना म्हणतेय, “एक बॉटल, दोन ग्लास… प्रतीक माझा फर्स्टक्लास…” ऋताने हा भन्नाट उखाणा घेत सर्वांची मनं जिंकली आहेत.
आणखी वाचा- “चित्रपटातील कलाकार मालिकेत काम करणाऱ्यांना कमी लेखतात” हृता दुर्गुळेने व्यक्त केली खंत
दरम्यान याच कार्यक्रमात सुबोध भावेनं ऋताला, ,चित्रपटात काम करणारे कलाकार मालिकेत काम करणाऱ्यांना कमी लेखतात का?’ असा प्रश्न विचारला होता. त्यावर तिने पटकन ‘हो’ असं उत्तर दिलं. त्यावर सुबोध भावेंने काही क्षणात, “असे कोणते कलाकार आहेत, त्यांची नावं सांग.” असं म्हटलं आणि त्यावर ऋता उत्तरली, “मी नाव सांगणार नाही, पण हे खरं आहे. सेटवर त्यांच्या वागण्या बोलण्यावरुन त्यांच्या वाइब्सवरुन कळतं.” बस बाई बसचा हा ऋता दुर्गुळे स्पेशल एपिसोड बराच चर्चेत राहिला.