छोट्या पडद्यावरील ‘फुलपाखरु’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून हृता दुर्गुळेला ओळखलं जाते. हृताने ‘फुलपाखरू’ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली. ती नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अशी तिची ओळख आहे. हृताने नुकतंच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने गेल्या ९ वर्षांपासून अभिनय क्षेत्रातील प्रवासबद्दल सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री हृता दुर्गुळेने इन्स्टाग्रामवर १३ मार्च रोजी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने तिच्या आतापर्यंतच्या अभिनय प्रवासाबद्दलची माहिती दिली आहे. तिचा हा व्हिडीओ २७ सेकंदाचा आहे. यात तिने तिचा कॅमेरासमोरील पहिला सीन आणि त्यानंतर आता अनन्या पर्यंतचा प्रवास सांगितला आहे.

“आजच्या दिवशी मार्च २०१३ साली ९ वर्षांपूर्वी माझा मालिकेचा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला. तो क्षण माझ्यासाठी महत्त्वाचा क्षण ठरला. या प्रवासात अनेक विविध रंगी भूमिका साकारत असताना माझा पहिला चित्रपट प्रदर्शित होत आहे, हे सर्व माझ्यासाठी अविश्वसनीय आहे”, असे तिने या व्हिडीओत म्हटले आहे.

यासोबत त्याला कॅप्शन देताना ती म्हणाली, “९ वर्ष…, जिद्द आणि मेहनतीचा एक सुंदर प्रवास…आजपासून ९ वर्षांपूर्वी, मी एक कलाकार म्हणून माझा पहिला शो दुर्वासह प्रवास सुरु केला. त्या दिवसापासून मी वेगवेगळ्या माध्यमातून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि आता माझा पहिला चित्रपट प्रदर्शित होण्याच्या अगदी जवळ आला आहे. हे सर्व अविश्वसनीय आहे… यासाठी मी कायमची कृतज्ञ!”

भरत जाधव रमला जुन्या आठवणीत, तब्बल ३० वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाला “या बसमध्ये…”

हृता सध्या ‘मन उडू उडू झालं’ मालिकेत दिपूची भूमिका साकारताना दिसत आहे. तर प्रतीकने काही मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. त्याने बेहद २, बहू बेगम, कुछ रंग प्यार के ऐसे भी, तेरी मेरी एक जिंदड़ी मालिकांसाठी काम केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hruta durgule completes 9 years in the industry shares a heartfelt note nrp