‘फुलपाखरू’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करणारी ऋता दुर्गुळे आज मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिचं नाव मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत सामील आहे. तिचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोवर्स असणाऱ्या मराठी मनोरंजन सृष्टीतील अभिनेत्रींच्या यादीत ऋताचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. पण काम मिळवण्यासाठी फॉलोवर्स महत्वाचे नसतात असं भाष्य तिने केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हल्ली सोशल मीडियावर आपले फॉलोवर्स जास्त असावे यासाठी अनेकजण प्रयत्न करताना दिसतात. तसंच आपले फॉलोवर्स जास्त असले की आपल्याला कामही मिळायला मदत होते असंही मनोरंजन सृष्टीत काम करू इच्छिणाऱ्या काहींना वाटतं. मात्र आता ऋताने यावर तिचं मत मांडलं आहे. अभिनय क्षेत्रात काम मिळवण्यासाठी कोणती गोष्ट सर्वात जास्त महत्त्वाची आहे हे तिने सांगितलं आहे.

आणखी वाचा : स्पेशल केक, नाच आणि बरंच काही… ‘वेड’ चित्रपटाच्या टीमने केलं जंगी सेलिब्रेशन

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या एका कार्यक्रमात ती म्हणाली, “मी ‘दुर्वा’ या मालिकेत जेव्हा काम करत होते तेव्हा सोशल मीडियाचा इतका विस्तार झाला नव्हता. पण मी जेव्हा ‘फुलपाखरू’ मालिकेत काम केलं तेव्हा सोशल मीडियावरून मला भरभरून प्रेम मिळालं. सोशल मीडियावरून प्रेक्षक माझं कौतुक करत होते. या मालिकेमुळे मी सोशल मीडियावरून अनेक चाहत्यांपर्यंत पोहोचू शकले. सोशल मीडियामुळे फॉलोवर्स नक्कीच मिळतात पण तुम्हाला मनोरंजन सृष्टीत काम मिळवायचं असेल तर उत्तम अभिनय करावा लागतो. याचं भान मला वेळोवेळी होतं म्हणून मी वाहवत गेले नाही. सोशल मीडियावर माझे फॉलोवर्स जरी भरपूर असले तरी आज तिकीट काढून माझ्या कलाकृती बघायला येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या खूप कमी आहे. हे चित्र बदलायला हवं.”

हेही वाचा : “… म्हणून ‘दादा एक गुड न्यूज आहे’ नाटक सोडलं,” ऋता दुर्गुळेने स्पष्ट केलं कारण

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीपर्यंत ऋता मन उडू उडू झालं या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. तसेच मध्यंतरीच्या काळात तिचे ‘टाईमपास 3’ आणि ‘अनन्या’ हे दोन चित्रपटही प्रदर्शित झाले. त्यामुळे आता ऋता कोणत्या नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hruta durgule shared what is important to get work in entertainment industry rnv