अनुराग कश्यपच्या ‘गँग ऑफ वासेपूर’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री हुमा कुरेशी ही अगदी कमी वेळात प्रसिद्धीच्या झोतात आली. मात्र, सध्या ती चर्चेत आहे ती सलमानचा भाऊ सोहेल खान याच्याशी असलेल्या मैत्रीमुळे. सोहेल आणि हुमा यांच्यात प्रेमसंबंध असल्याच्या बातम्या गेले काही दिवस सुरु होत्या. पण, या सर्व बातम्यांचे हुमाने खंडण केले होते. सोहेल हा माझ्यासाठी भावासारखा आहे असे तिने म्हटलेले.
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत हुमा म्हणाली की, माझ्या आयुष्यात काय चाललंय याबाबत मी ट्विटरवरुन लोकांशी नेहमीच संवाद साधते.  पण माझ्या आयुष्यातील ख-या गोष्टी न जाणता माझ्याविषयी माध्यमांकडून काही बोलले जाते, याचे मला फार दुःख वाटते. ते असे का करतात, हे मी तुम्हाला सांगते. मी करत असलेले कठोर परिश्रम लोकांकडून नजरअंदाज केले जावेत यासाठी हे सर्व चालले आहे. आज मी जे काही नाव कमवले आहे ते माझ्या परिश्रमामुळे नाही तर त्या विशिष्ट माणसाच्या जवळीकीमुळे असल्याचे त्यांना दाखवायचे आहे. आणि हे कदापि मान्य केले जाणारे नाही.
काही दिवसांपूर्वी सोहेलची पत्नी सीमा हिने त्यांचे राहते घर सोडले होते. मात्र, काही दिवसांतच ती आपल्या मुलांसह घरी परतली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा