बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी सध्या तिच्या खासगी आणि प्रॉफेशनल लाइफमुळे चर्चेत आली आहे. हुमाने करोना रुग्णांसाठी १०० बेड्सच्या रुग्णालयाची व्यवस्था केली आहे. तर दुसरीकडे ती लवकरच’ महाराणी’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या वेब सीरिजमध्ये हुमा बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. याच निमित्ताने हुमाने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत हुमाने या वेब सीरिज आणि आणखी अनेक गोष्टींवर चर्चा केली.
हुमाने नुकतीच ‘नवभारत टाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने खऱ्या आयुष्यात मुख्यमंत्री झाल्यावर काय वाटेल ते सांगितले आहे. “देशात सुरू असलेल्या राजकारणाबद्दल तुझं काय मत आहे आणि खऱ्या आयुष्यात तू कधी मुख्यमंत्री झाली तर तुला कसं वाटेल?” असा प्रश्न हुमाला विचारण्यात आला होता. “मला राजकारण समजत नाही. मी यावर गप्प बसते कारण राजकारण हे माझ्या समजण्यापलीकडचे आहे. जर मी खरोखर एखाद्या दिवशी मुख्यमंत्री झाली तर मी त्याला एक भयानक स्वप्न समजून झोपी जाईल,” असे हुमा म्हणाली.
View this post on Instagram
पुढे महारानी या वेब सीरिजमधील बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या भूमिकेबद्दल बोलताना हुमा म्हणाली, “राणी ही माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि आव्हानात्मक भूमिका आहे. बोलण्यापासून त्यांची चालण्याची पद्धत या सगळ्या गोष्टीवर काम करावे लागले. बिहारची बोली भाषा तर मी ‘गँग्स ऑफ वासेपुर’मध्ये बोलली होती, त्यामुळे त्यात फारशी अडचण नव्हती. कोणता शब्द कशा प्रकारे उच्चारायचा हे मी पटकन शिकते. परंतु राणीची साडी परिधान करण्याची स्टाईल, बिंदी, सिंदूर, बिछिया, मंगलसूत्र, सुहागनची ही सगळी चिन्हे असतात, आणि हे सगळं देखील वेगळं होतं. हुमाने तिच्या खऱ्या आयुष्यात ती जशी आहे त्याच्या संपूर्ण विरुद्ध असणारी भूमिका साकारली, परंतु तिला मला आली.”
‘महाराणी’ या वेब सीरिजचे दिग्दर्शन हे करण शर्मा करत आहेत. तर या वेब सीरिजचे निर्माते सुभाष कपूर आहेत. या वेब सीरिजमध्ये हुमा सोबत सोहम शाह, अमिक सियाल, विनीत कुमार मुख्य भूमिकेत असणार आहेत. तर हुमा लवकरच हॉलिवूडच्या जॉम्बी चित्रपट ‘आर्मी ऑफ द डेड’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये एण्ट्री करणार आहे.