चित्रपटकर्ता महेश भट्ट यांनी इमरान हाश्मी आणि विद्या बालनचा अभिनय असलेल्या हमारी अधुरी कहानी चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रसिद्ध केला आहे. मोहित सुरी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती भट्ट कँपच्या विशेष फिल्म्सद्वारे करण्यात आली आहे. चित्रपटाच्या फर्स्टलूकमध्ये इमरान आणि विद्या एकमेकांकडे भावपूर्ण नजरेने पाहताना दिसतात. १२ जूनला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात दिव्यतेच्या टोकाला स्पर्श करणाऱ्या एका अनैतिक (अवैध) प्रेमसंबंधाची कहाणी दर्शविण्यात आल्याचे महेश भट्टनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. या चित्रपटाद्वारे जवळजवळ तीन वर्षांनी इमरान भट कँपमध्ये परतला आहे. २०१२ मध्ये आलेला राजा थ्रीडी हा त्याचा भट कॅंपमधील अखेरचा चित्रपट होता. इमरान आणि विद्या तिसऱ्यांदा चित्रपटात एकत्र काम करीत आहेत. याआधी त्यांनी डर्टी पिक्चर आणि घनच्चकर चित्रपटात एकत्र काम केले होते.
‘हमारी अधुरी कहानी’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रसिद्ध
चित्रपटकर्ता महेश भट्ट यांनी इमरान हाश्मी आणि विद्या बालनचा अभिनय असलेल्या हमारी अधुरी कहानी चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रसिद्ध केला आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
आणखी वाचा
First published on: 13-02-2015 at 05:15 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजनManoranjanविद्या बालनVidya Balanहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 3 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Humari adhuri kahani film first look release vidya balan emraan hashmi