मिलिंद बोकील लिखित ‘शाळा’ या गाजलेल्या कादंबरीवर दिग्दर्शक सुजय डहाके यांनी याच नावाचा तयार केलेला चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. पण तुम्हाला माहित आहे का, ‘शाळा’ कादंबरीवर मराठी चित्रपट येण्यापूर्वीच त्यावर हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता. विशेष म्हणजे या हिंदी चित्रपटात चक्क मराठी कलाकारचं मुख्य भूमिकेत झळकले होते.
२००८ साली ‘शाळा’ या कांदबरीवर ‘हमने जीना सिख लिया’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटामध्ये मराठीतील आताचा प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हे मुख्य भूमिकेत झळकले होते. सिद्धार्थने ‘अश्विन’ची तर मृण्मयीने ‘परी’ची व्यक्तिरेखा चित्रपटात साकारली होती. याच चित्रपटाद्वारे मृण्मयी आणि सिद्धार्थने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेले. ‘हमने जीना सिख लिया’ चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांचा सहाय्यक संचालक मिलींद उके याने केले होते.
‘शाळा’ कादंबरीवर मराठीपूर्वी आला होता हिंदी चित्रपट
सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे हे मुख्य भूमिकेत झळकले होते.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 02-03-2016 at 01:05 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Humne jeena sikh liya based on the popular marathi novel shaala