साजिद खान निर्माता-दिग्दर्शित विनोदी चित्रपट ‘हमशकल्स’ शुक्रवारी प्रदर्शित झाला. प्रेषकांनी या फिल्मकडून खूप आशा-अपेक्षा ठेवल्या होत्या. मात्र साजिद त्या यावेळी पूर्ण करु शकला नाही आहे. असे असतानाही या चित्रबटाने तब्बल २५ कोटींची कमाई केली आहे.
चित्रपट समीक्षकांनी ‘हमशकल्स’ला केवळ अर्धा ते एक स्टार देऊन चित्रपटाबाबत नापसंती दर्शविली आहे. मात्र तरीही प्रेक्षकांची पावले चित्रपटगृहांकडे वळली असून चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ‘हमशकल्स’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सर्वात जास्त कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने १२.५ कोटींची कमाई केली होती. याआधी सलमानच्या ‘जय हो’च्या पहिल्याच दिवशी १७ कोटींची कमाई करून विक्रम केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा