‘वासू’गिरीवरचा सिनेमा किंवा त्याहीपेक्षा ‘वासू’गिरी करण्यात रमणाऱ्या एकाची प्रामाणिक कथा हा उल्लेख जास्त योग्य ठरेल, अशा शब्दांत दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णी त्याच्या सिनेमाचा- ‘हंटर’चा- उल्लेख करतो. पण हिंदी चित्रपटांमध्ये लैंगिक संबंधांवर भाष्य करणारे विनोदी, गंभीर असे हरतऱ्हेचे चित्रपट येऊन गेले आहेत. त्यांची नावंही तितकीच स्पष्ट. मग तो ‘लव्ह, सेक्स और धोखा’ असेल, ‘जिस्म’ असेल किंवा आणखी काही.. पण वासूगिरी हा शब्द मराठी. त्याचा उलगडा अन्य भाषिकांना होणं कठीण असल्याने या चित्रपटाचं नामकरण ‘हंटर’ असं करण्यात आलं आहे. तरीही हा चित्रपट एकंदरीतच या विषयाकडे प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न असल्याचं हर्षवर्धन कुलकर्णी यांनी सांगितलं. ‘हंटर’चा नायक हा मंदार पोंक्षे नावाचा मराठी तरुण आहे. चित्रपटाच्या दोन्ही नायिका, दिग्दर्शक आणि अन्य मराठी कलाकार अशा मराठमोळ्या माणसांनी हाताळलेल्या या वासूगिरीवरच्या सिनेमाविषयी त्यांच्याशी गप्पा मारताना हिंदीत गेल्या काही वर्षांमध्ये आलेल्या अशा वेगळ्या चित्रपटांचा घेतलेला हा आढावा..
दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णीचा हा पहिलाच चित्रपट आहे. गेली काही वर्षे इंडस्ट्रीत पटकथाकार आणि जाहिरात दिग्दर्शक म्हणून ओळख असलेल्या हर्षवर्धनचं नाव ‘हंसी तो फंसी’ या चित्रपटाचा पटकथालेखक म्हणून गेल्या वर्षी ठळकपणे लोकांसमोर आलं. सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणिती चोप्रा या दोघांना घेऊन के
अनुराग या चित्रपटाशी फार नंतर जोडला गेला, असं हर्षवर्धनने सांगितलं. अनुराग आणि विकासला पटकथा आवडली. त्यांनी चित्रपट पाहिला आणि मग त्यांनी स्वत:हून हा चित्रपट प्रस्तुत करण्याचा निर्णय घेतला. ‘फँटम’सारखा बॅनर चित्रपटामागे असणं हेच मोठं काम आहे. त्यांनीच मग या चित्रपटासाठी खास योजना तयार केल्या. ‘हंटर’मध्ये मंदार पोंक्षेची भूमिका ‘शैतान’ फेम गुलशन देवियाहने रंगवली आहे. तर त्याच्या नायिका म्हणून राधिका आपटे आणि सई ताम्हणकर या दोन मराठी अभिनेत्री दिसणार आहेत. सईचा हा नायिका म्हणून पहिलाच हिंदी चित्रपट आहे. यात तिने पस्तिशीतील विवाहित स्त्रीची भूमिका रंगवली आहे. मला या चित्रपटातली भूमिका खूप आव्हानात्मक वाटली. एक पस्तिशीची मध्यमवर्गीय घरातील स्त्री तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या एका तरुणाशी लैंगिंक संबंध ठेवण्याचं धाडस करते. आतापर्यंत आपल्या
गेले काही दिवस सगळ्याच चुकीच्या कारणांसाठी चर्चेत असलेल्या राधिका आपटेने चित्रपटात तृप्तीची भूमिका केली आहे. मंदार पोंक्षेंच्या आयुष्यात आलेली तृप्ती ही आजची अत्याधुनिक विचारांची तरुणी आहे. ‘बदलापूर’नंतर एकदम बोल्ड अभिनेत्री असा शिक्का राधिकावर मारला गेला आहे. मात्र हा बोल्डपणाचा ठपका आपल्यावर आणि ‘हंटर’ या चित्रपटावरही उगीचच लावण्यात आला आहे, असं मत राधिका व्यक्त करते. लैंगिक विषयाची मांडणी करणारा चित्रपट म्हणजे तो ‘बोल्ड’च असणार असं काहीतरी गृहीतक मांडलं जातं. ‘हंटर’ हा अजिबात बोल्ड चित्रपट नाही. आपल्या समाजात या विषयावर खुलेपणानं बोलणंच पसंत केलं जात नाही आणि म्हणून मग हे बोल्ड वगैरेचं लेबल लावलं जातं. उलट, तृप्ती ही आजवरची एकदम सरळ-साधी भूमिका होती, असं राधिकाने सांगितलं. ‘शैतान’, ‘दॅट गर्ल इन यलो बूट’, ‘दम मारो दम’सारख्या हिंदी चित्रपटांमधून काम केलेल्या गुलशन देवियाहने या चित्रपटात मुख्य नायकाची भूमिका साकारली आहे. मंदारसारखा तरुण रंगवणं फारसं अवघड नाही, असं तो म्हणतो. चित्रपटाचा विषयच जगभरात कोणालाही अपील करेल असा असल्याने तिथे भाषेचा विचारच उरत नाही. मात्र, मराठी बोलण्याची ढब आत्मसात करण्यासाठी थोडी मेहनत घेतली असल्याचे तो म्हणतो..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा