अभिनयाच्याबाबतीत बॉलीवूडमधील तिन्ही खानांची एकमेकांशी तुलना करणे अशक्य असल्याचे मत अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने व्यक्त केले. मात्र, इतक्या वर्षानंतरही त्यांनी स्वत:चे सुपरस्टार्सचे बिरुद ज्याप्रकारे टिकवून ठेवले आहे, ही गोष्ट वाखाणण्याजोगी असल्याचे नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितले.
नवाजुद्दीनने सध्या ‘रईस’ या चित्रपटात शाहरूख खानसोबत काम करत आहे. यापूर्वी त्याने ‘तलाश’मध्ये आमिर खानसोबत तर ‘बजरंगी भाईजान’मध्ये सलमानसोबत काम केले होते. त्यामुळे आता नवाजुद्दीनच्या खात्यात बॉलीवूडच्या तिन्ही खानांबरोबर काम करण्याचा अनुभव जमा झाला आहे. यानिमित्ताने खान त्रयींमध्ये श्रेष्ठ कोण असा प्रश्न विचारण्यात आला असता नवाजुद्दीनने तिन्ही खान्सची एकमेकांशी तुलना करणे शक्य नसल्याचे सांगितले. प्रत्येक अभिनेत्याची स्वत:ची अशी एक शैली असते. त्यामुळे आपल्याला त्यांची एकमेकांशी तुलना करता येणार नाही. ते तिघेही  श्रेष्ठ आहेत आणि सुपरस्टार्स आहेत, असे नवाजुद्दीनने यावेळी म्हटले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I admire the way khans have sustained themselves as superstars for long nawazuddin siddiqui