बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि त्याचे कुटुंबीय सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सैफ अली खानला त्याची पहिली पत्नी अमृता सिंहपासून सारा आणि इब्राहिम अशी दोन मुले आहेत. तर दुसरी पत्नी करीना कपूरपासून तैमूर आणि जहांगीर अशी दोन मुले आहेत. सैफ हा आपल्या चारही मुलांची व्यवस्थितपणे काळजी घेतो. तो अनेकदा त्याच्या मुलांसोबत वेळ घालवताना दिसतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सैफचे त्याचा मोठा मुलगा इब्राहिमवर विशेष प्रेम आहे. तो नेहमी त्याच्यासोबत एकत्र फिरताना दिसतो. नुकतंच एका मुलाखतीत सैफने त्याला इब्राहिमच्या करिअरची फार काळजी वाटत असल्याचे सांगितले आहे. ‘झूम’ या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सैफ म्हणाला, “मला इब्राहिमच्या करिअरची फार काळजी वाटत आहे. पण तो फार मेहनत घेतो, याचा मला आनंद नक्कीच आहे. त्याच्या शालेय जीवनातही तो फार हुशार होता. त्यामुळे इतर पालकांप्रमाणेच मी त्याला उज्ज्वल भविष्यासाठी फार फार शुभेच्छा देतो.”

सैफ अली खानचा मोठा मुलगा इब्राहिम ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलीला करतोय डेट? चर्चांना उधाण

“इब्राहिमचे आता कविता वाचण्याचे वय राहिलेले नाही. मी जेव्हा त्याच्या वयात होतो, तेव्हा त्याच्यासारखाच वागायचो. तो फार साधा आणि सरळ वागतो जे चांगले आहे. पण प्रत्येकवेळी भविष्यात ती वृत्ती योग्य असेलच असं नाही”, असेही सैफ अली खानने म्हटले.

वयाच्या ६० व्या वर्षी सैफ करतोय बाबा होण्याचा विचार? करीना कपूर सक्त ताकीद देत म्हणाली…

सध्या सैफ अली खान ‘विक्रम वेधा’ या चित्रपटामध्ये काम करत आहे. यात त्याच्यासोबत हृतिक रोशन देखील झळकणार आहे. यासोबतच तो प्रभाससोबत ‘आदिपुरुष’ या चित्रपटात काम करत आहे. तर सैफचा मुलगा इब्राहिम अली खान चित्रपट निर्माता करण जोहरसोबत ‘रॉकी और रानी की प्रेम’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत आहे.

काही दिवसांपूर्वीच इब्राहिम हा वरुण धवन आणि अनन्या पांडे यांच्यासोबत करण जौहरच्या ऑफिसबाहेर दिसला होता. त्यामुळे लवकरच तो बॉलिवूडमध्ये झळकणार असल्याची चर्चा रंगली आहे.