करोना रुग्णांची संख्या सध्या वेगाने वाढत आहे. यासाठी दक्षता म्हणून सरकारकडून वारंवार काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. शाहिद कपूरचा एक फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यात तो स्वतःची जास्तच काळजी घेत असल्याचं दिसून येत आहे. फोटोग्राफर व्हायरल भयानीने त्याचे फोटो शेअर केले आहेत.
शाहिदचा हा फोटो मुंबई विमानतळावरचा आहे. यात तो मास्क, सनग्लासेस तसंच फेस शिल्ड घालून वावरताना दिसून येत आहे. फोटोग्राफर व्हायरल भयानीने हा फोटो शेअर केला असून त्याच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, “तो श्वास घेऊ शकत असेल तर त्याला ५ स्टार्स.” त्यावर शाहिदने भन्नाट कमेंट केली आहे.
View this post on Instagram
यात तो म्हणतो, “नाही, खरंतर आता एका वर्षापेक्षा जास्त काळ मी श्वास रोखून धरला आहे.”
शाहिदच्या चाहत्यांनीही त्याचं कौतुक केलं आहे. एकजण म्हणतो की, म्हणूनच तू एव्हरग्रीन आहेस. तर एका चाहत्याने शाहिदला इतरांनाही मास्क वापरण्याचं आवाहन करण्याबद्दल सुचवलं आहे. तर एकजण म्हणतो की, त्याच्यावर त्याच्या दोन मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी असल्याने तो एवढी काळजी घेत आहे.
गेल्या काही दिवसांत बप्पी लहरी, आमीर खान, आर. माधवन, रणबीर कपूर, कार्तिक आर्यन, परेश रावल अशा अनेक कलाकारांना करोनाची लागण झाली आहे.
शाहिदच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो लवकरच ‘जर्सी’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या तेलुगू चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात पंकज कपूर आणि मृणाल ठाकूर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. लवकरच तो डिजीटल विश्वातही पदार्पण करणार असल्याचं वृत्त आहे.