बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ पुढील वर्षाच्या अखेरीस लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा ताजी असतानाच खुद्द रणबीरने अद्याप लग्नाचा विचार करत नसल्याचा खुलासा करून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. सध्या चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त असल्यामुळे लग्नाबाबत अद्याप तरी विचार केला नसल्याचे रणबीरने सांगितले. तो म्हणाला की, “होय आम्ही प्रेमात आहोत मात्र लग्नाचा विचार अद्याप केलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून माझ्या लग्नाबाबतच्या चर्चांना उगीच उधाण आलं होतं. पण, सध्यातरी लग्नाचा विचार नाही”
दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका सुप्रसिद्ध बंगाली वृत्तपत्राने रणबीर आणि कतरिना यांनी शुभमंगल करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच दोघेही लग्नबंधणात अडकणार असल्याचे वृत्त दिले होते. यावर कतरिनाने खुलासा देत आपल्या लग्नाचे वृत्त फेटाळून लावले होते. त्यानंतर आता रणबीरनेही लग्नाबाबतच्या सर्व अफवा पसरवल्या जात असून सध्या चित्रपटांमध्येच व्यस्त असल्याचे मंगळवारी स्पष्ट केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा