दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिला ओळखले जाते. समांथाने तिच्या सौंदर्यासोबतच अभिनयाची छाप पाडून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने ‘ये माया चेसवे’ या चित्रपटातून २०१० साली टॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पतीला घटस्फोट दिल्यानंतर आता समांथा ही तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समांथाने नुकतंच एका प्रसिद्ध मासिकासाठी बोल्ड फोटोशूट केले आहे. पीकॉक मॅगझिनसाठी तिचे फोटो कवर पेज म्हणून झळकणार आहेत. यावेळी तिने अतिशय बोल्ड पोज दिल्या आहेत. यापूर्वीही तिने अनेक मासिकांसाठी बोल्ड शूट केल्यामुळे तिला ट्रोल करण्यात आले होते.

नुकतंच एका मुलाखतीदरम्यान तिने तिचा पती नागाचैतन्यच्या कुटुंबाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. यावेळी ती तिच्या करिअरबद्दल बोलताना म्हणाली, “एकेकाळी मला माझ्या त्वचेबद्दल फार अस्वस्थ वाटत होते. पण आता इतक्या सर्व प्रोजेक्टमध्ये काम केल्यानंतर मी नक्कीच सांगू शकते की माझा आत्मविश्वास वाढला आहे. कदाचित वाढते वय आणि मॅच्युरिटीमुळे हे आले असावे.”

“मला माझ्या त्वचेला नीट करण्यासाठी थोडा वेळ लागला. पण आता मात्र मी विविध भूमिका आत्मविश्वासाने साकारते. मग ते एखादे बोल्ड गाणे असो किंवा मग अॅक्शन सीन. मी यापूर्वी हे करण्याचे धाडस कधीही केले नव्हते.” असे समांथा म्हणाली.

दरम्यान सध्या समांथा ही फार व्यस्त अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. ती लवकरच ‘शकुंतलम’ आणि ‘यशोदा’ यासारख्या चित्रपटात झळकणार आहे. त्यासोबतच समांथा ही सध्या अभिनेता विजय देवरकोंडासोबत स्क्रीन शेअर करत आहे. या चित्रपटाचे शूटींग काश्मीरमध्ये सुरु आहे.

समांथा आणि विजय यांचा हा चित्रपट रोमँटिक असणार आहे. दिग्दर्शक शिव निर्वाण हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटात कथा ही लष्कर जवानावर आधारित असल्याचे बोललं जात आहे. यात विजय हा लष्कर जवानाच्या भूमिकेत असणार आहे. येत्या वर्षात या शूटींगला सुरुवात होणार असून पुढील वर्षी २०२३ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am much more confident now said samantha ruth prabhu on bold photoshoot and item songs nrp