नृत्य दिग्दर्शक आणि दिग्दर्शक प्रभूदेवा यंदाच्या आयफा पुरस्कार सोहळ्यात श्रीदेवीसोबत थिरकताना दिसणार आहे. श्रीदेवीच्या काही चर्चित गाण्यांवर हे दोघे पहिल्यांदाच एकमेकांबरोबर नृत्य सादर करणार आहेत. प्रेक्षकांना आमचे नृत्य आवडेल अशी आशा प्रभूदेवाने व्यक्त केली. श्रीदेवीच्या नृत्यावर टिप्पणी करणारा मी कोणी नाही. त्यांची नृत्याची एक वेगळीच शैली असून त्यांच्याबरोबर नृत्य करण्याची मला संधी मिळाल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो, असे प्रभूदेवा म्हणाला.
अनेक वर्षांनंतर श्रीदेवी या पुरस्कार सोहळ्यातील तिच्या स्टेज शोद्वारे पुनरागमन करत आहे. यापूर्वी प्रभूदेवा माधुरी (पुकार) आणि सोनाक्षी सिन्हा (ओ माय गॉड) यांच्यासोबत थिरकताना दिसला होता. प्रभूदेवा म्हणाला की, सोनाक्षी ही एक चांगली अभिनेत्री असून तिच्यासोबत मी रॅम्बो राजकुमार हा चित्रपट करत आहे. या चित्रपटाचे काम पूर्ण होताच तिच्यासोबत मी अजून एक चित्रपट करणार असून या चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. या आगामी चित्रपटात अजय देवगण तीन अभिनेत्रींसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा