रणबीर आणि कतरिना कैफ यांच्यात मैत्री व्यतिरिक्त आणखी काही असल्याचे कयास लावले जात असताना, आपण इतक्यात लग्न करणार नसल्याचे कतरिनाने स्पष्ट केले. परंतु, रणबीरच्या लग्नात आपल्याला नाचायला आवडेल, अशी इच्छा तिने व्यक्त केली. ‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमात करीनाकडून आपला ‘वहिनी’ म्हणून करण्यात आलेला उल्लेख हा मजेने करण्यात आल्याचे म्हणत, त्यात गंभीर असे काही नसल्याचा खुलासा तिने केला. ती म्हणाली, रणबीरने त्याच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करावे. त्याचप्रमाणे त्याच्या लग्नात ‘बेशरम’ या गाण्यावर आपल्याला नाचायला आवडेल. मी इतक्यात लग्न करणार नसून, आणखी १०-२० वर्षांत माझे लग्न होईल, असे वाटत नसल्याचे देखील ती म्हणाली.
मी इतक्यात लग्न करणार नाही – कतरिना कैफ
रणबीर आणि कतरिना कैफ यांच्यात मैत्री व्यतिरिक्त आणखी काही असल्याचे कयास लावले जात असताना, आपण इतक्यात लग्न करणार नसल्याचे कतरिनाने स्पष्ट केले. परंतु, रणबीरच्या लग्नात आपल्याला नाचायला आवडेल, अशी इच्छा तिने व्यक्त केली. 'कॉफी विथ करण' कार्यक्रमात करीनाकडून आपला 'वहिनी' …
First published on: 11-12-2013 at 01:30 IST
TOPICSकतरिना कैफKatrina KaifबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 2 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am not getting married anytime soon clarifies katrina kaif