रणबीर आणि कतरिना कैफ यांच्यात मैत्री व्यतिरिक्त आणखी काही असल्याचे कयास लावले जात असताना, आपण इतक्यात लग्न करणार नसल्याचे कतरिनाने स्पष्ट केले. परंतु, रणबीरच्या लग्नात आपल्याला नाचायला आवडेल, अशी इच्छा तिने व्यक्त केली. ‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमात करीनाकडून आपला ‘वहिनी’ म्हणून करण्यात आलेला उल्लेख हा मजेने करण्यात आल्याचे म्हणत, त्यात गंभीर असे काही नसल्याचा खुलासा तिने केला.  ती म्हणाली, रणबीरने त्याच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करावे. त्याचप्रमाणे त्याच्या लग्नात ‘बेशरम’ या गाण्यावर आपल्याला नाचायला आवडेल. मी इतक्यात लग्न करणार नसून, आणखी १०-२० वर्षांत माझे लग्न होईल, असे वाटत नसल्याचे देखील ती म्हणाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा