बॉलीवूडची स्टाईल दीवा गेल्यावर्षी अभिनेता सैफ अली खानसोबत विवाहबंधनात अडकली. १६ ऑक्टोबरला यांनी अगदी आनंदात लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. मात्र, आपल्या पतीवर अतोनात प्रेम करणारी करिना करवा चौथचा उपवास करणार नसल्याचे तिने सांगितले.
करिना म्हणाली की, मला सैफवरचं प्रेम सिद्ध करण्यासाठी उपवास करण्याची गरज नाही. त्यामुळे करवा चौथचा उपवास मी करणार नाही. मी कपूर आहे आणि आम्ही खाण्याशिवाय जगूच शकत नाही. खाऊन, काम करून आणि माझ्या आगामी चित्रपटांचे प्रमोशनने मी करवा चौथचा उत्सव साजरा करेन. मलबार गोल्ड अॅण्ड डायमण्डची करिना ब्रॅण्ड अम्बॅसिडर असून तिने ऑनलाईन स्टोअरचे उद्घाटन केले. त्यावेळी ती बोलत होती.
ऑनलाईन खरेदीमुळे माझा खूप वेळ वाचतो. माझ्या कष्टाच्या पैशांनी खरेदी केलेले दागिने हे माझ्यासाठी नेहमीच महत्वाचे आहेत. सोने आणि हिरे हे दागिन्यांमधील सर्वात चांगले फॅशन स्टेटमेण्ट आहे. तसेच, मी कोणताही ट्रेण्ड फॉलो करत नाही. मला नाजूक दागिने घालायला आवडतात, असेही करिना यावेळी म्हणाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा