बॉलीवूड अभिनेत्री त्यांच्या झिरो साइजमुळे नेहमीच चर्चेत असतात. पण, झिरो साइजपेक्षा आपले काम जास्त बोलते, असे सोनाक्षी सिन्हाचे म्हणणे आहे. २६ वर्षीय सोनाक्षीने ‘लुटेरा’ चित्रपटात रणवीर सिंगसोबत १९५० सालातल्या एका बंगाली मुलीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीकरिता ती कलर्स वाहिनीवरील ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ या कॉमेडी शोमध्ये गेली होती. त्याचवेळेस तेथील प्रेक्षकाने तिला साइज झिरोबाबत विचारले असता सोनाक्षीने पलटवार करत भारतीय सिनेमातील डौलदार बांध्याच्या अभिनेत्रींसाठी तुम्हाला काही समस्या आहे का? असा प्रश्न विचारत मी कामाला महत्व देत असून साइज झिरोला प्राधान्य देत नाही, असे सोनाक्षी म्हणाली.
लुटेरा ५ जुलैला बॉक्स ऑफिसवर येणार आहे.

Story img Loader