बॉलीवूडची ‘हॉट स्टार’ अभिनेत्री मल्लिका शेरावतने आपल्या नव्या ‘दि बॅचलोराईट इंडिया- मेरे खयालो की मल्लिका’ या टेलिव्हीजन कार्यक्रमातून मी एका उत्तम पती नाही तर, खऱया प्रेमाच्या शोधात असल्याचे म्हटले आहे.
विशेष म्हणजे या खऱया प्रेमाच्या शोधात मल्लिकाने यावेळी राजकीय व्यक्तींमध्ये रस असल्यासारखे वक्तव्य केले आहे. मल्लिका म्हणते, “मी कोणत्याही आशा न बाळगणारी रोमॅन्टिक मुलगी आहे. मला ते (नरेंद्र मोदी) आवडतात. राहुल गांधींमध्ये मला स्वारस्य नाही”
मल्लिकाने याआधीही नरेंद्र मोदींची स्तुती करत ते देशातील सर्वात योग्य अविवाहित पुरुष असल्याचे म्हटले होते तसेच मोदींच्या वाढदिवशी मल्लिकाने शुभेच्छा देणारा ‘व्हिडिओ मॅसेज’ मोदींना पाठविला होता. लग्नाबाबत मल्लिका म्हणते, “मला मनोरंजन क्षेत्राशी निगडीत व्यक्तीशी विवाह करण्यात रस नाही. मला वैवाहित जीवनात सर्वसामान्यपणा हवा आहे. त्यामुळे आतापर्यंत अनेक अभिनेत्रींचे डॉक्टर, व्यावसायिकांशी विवाह झालेले आहेत.”

Story img Loader