बॉलीवूड सेलिब्रेटी फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम या सोशल साइट्सवर आता ब-यापैकी अॅक्टिव राहू लागले आहेत. असे असतानाच मि.परफेक्टशनिस्ट आमिर खान तरी कसा मागे राहिल. बॉलीवूड अभिनेता आमिर खान ट्विटर आणि फेसबुकनंतर इन्स्टाग्रामवरही अॅक्टिव झाल्याची चर्चा सध्या रंगली होती. मात्र, आपण इन्स्टाग्रामवर नसल्याचा खुलासा त्याने केला आहे.
ट्विटवर त्याने आपल्या सर्व चाहत्यांचा भ्रम दूर केला. आपल्या नावाचे कोणीतरी खोटे अकाउन्ट तयार केल्याचे त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. इन्स्टाग्रामवर पत्नी किरण रावसोबत असलेला आमिरचा फोटो टाकण्यात आला होता.