जेव्हा अभिनयाचा विषय येतो त्यावेळी बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण ही स्वार्थी होते. ‘तमाशा’ चित्रपटातील नव्या गाण्याच्या प्रदर्शनावेळी दीपिका बोलत होती.
आम्ही सर्वच जण प्रत्येक भूमिका साकारताना मेहनत करतो. प्रत्येकाला काम करताना स्वातंत्र्य हवे असते. पण त्याचसोबत मी इतरही गोष्टींवर लक्ष ठेऊन असते आणि एक अभिनेत्री म्हणून मी स्वार्थी आहेचं. ‘पीकू’ हा माझा चित्रपट प्रदर्शित होऊन गेला. आता ‘तमाशा’ प्रदर्शित होईल आणि त्यानंतर ‘बाजीराव मस्तानी’ येईल. त्यामुळे मी खूप आनंदात आहे, असे दीपिका म्हणाली.
आगामी ‘तमाशा’ चित्रपटाविषयी बोलताना ती म्हणाली की, बंधनांना जुगारून आणि आपण कसे वेगळ्या पद्धतीने आपल्या भावना व्यक्त करू शकतो हे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. या चित्रपटात रणबीर कपूरही मुख्य भूमिकेत आहे.

Story img Loader