‘मै भी हूँ शमिताभ..’ अमिताभ यांच्या आवाजातली जरब, अदब आणि या आवाजावर त्यांची असलेली हुकमत यांनाच शस्त्र बनवून एखादी प्रत्यक्षाहून उत्कट प्रतिमा निर्माण करायची कल्पना दिग्दर्शक आर. बाल्कीची.. खुद्द अमिताभसुद्धा ‘यह तो बाल्की का करिश्मा है’ म्हणत आनंदाने मान डोलावतात. मात्र, अशा प्रकारची कुठलीही भूमिका अमिताभ बच्चन नावाचा सुपरस्टार लीलया पेलू शकतो हा विश्वास असल्याशिवाय ‘शमिताभ’सारख्या चित्रपटांची पर्वणी प्रेक्षकांना मिळणे कठीणच. यावर्षी तर असे तीन वेगवेगळे ‘अमिताभ’रूपी चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. वर्षांच्या सुरुवातीलाच त्यांच्याशी ‘शमिताभ’ ते ‘वजीर’ आणि हिंदी चित्रपटसृष्टीचा आजचा प्रवाह याविषयी मारलेल्या गप्पा..
यावर्षी अमिताभ आर. बाल्की, शुजित सिरकार आणि बिजॉय नम्बियार अशा आजच्या पिढीच्या तीन दिग्दर्शकांबरोबर चित्रपट करत आहेत. आजच्या चित्रपटांबद्दल बोलताना एरव्ही आपल्या जुन्या
पण, तुमच्यासाठी अशा व्यक्तिरेखा लिहिल्या जातात तेव्हा विचारांशी जुळवून घेण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते?, असं विचारल्यावर माझा असा वेगळा विचारच नसतो, असं ते स्पष्टपणे सांगून मोकळे होतात. ‘मला अजूनही काम मिळतं आहे याच्यासाठी मी पहिल्यांदा स्वत:ला भाग्यवान मानत आलो आहे. त्यानंतर मग एकदा चित्रपट मिळाल्यानंतर काय प्रकारच्या भूमिका आहेत, कथा आहे ते ऐकायचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतो. माझे मित्र जेव्हा माझ्यासाठी अशा खास छोटय़ा-मोठय़ा भूमिका आणतात आणि ते तुम्हीच केलं पाहिजे, असं सांगतात तेव्हा त्यांच्यासाठी त्या केल्याच पाहिजेत, एवढय़ा एकाच भावनेने मी माझ्या कामाला सुरुवात करतो,’ असं त्यांनी सांगितलं.
आता बाल्कीचंच उदाहरण घ्या ना.. म्हणत अमिताभ ‘शमिताभ’ या विषयावर येतात. बाल्कीचं डोकंच विचित्र आहे, ते फार वेगळा विचार करतात. असं काही ज्याची कल्पना याआधी कुणी केली नसेल, असं जे आधी कुणी पाहिलं नसेल, कुणी ऐकलं नसेल असं काहीतरी वेगळंच ते मांडून जातात. आणि कलाकारांसाठी हेच आव्हान असतं. ‘चलो बच्चा यह दिया है तुमको. अब निपटो इससे..’, अशी तुमची व्यक्तिरेखा तुमच्या हातात दिल्यावर बाकी कलाकाराचंच कसब असतं. खरंतर, मी इतकी वर्षे बाल्कीबरोबर काम केलं आहे. आता चित्रपटांमधून केलं, त्याआधी जाहिरातीतही त्यांच्याबरोबर काम केलं आहे. तरीही बाल्की जेव्हा पहिल्या दिवशी मला काही ऐकवायला घेऊन येतो तीच मुळी नवलाईच्या धक्क्यांची सुरुवात असते, असं ते सांगतात. त्यांच्या कल्पना ऐकल्यानंतर तू बहुतेक पिऊन आला आहेस. मला कळत नाही आहे नक्की तू काय ऐकून आला आहेस, विचार करून आला आहेस.. याच संवादांपासून माझी सुरुवात होते. पण, तीच त्यांची खासियत आहे. ते जीवनाकडे फार वेगळ्या दृष्टीने बघतात. चित्रपट, त्याची कथा, मांडणी या सगळ्याकडे पाहण्याचा बाल्कीचा दृष्टिकोन फार वेगळा आहे. माझ्यासाठी हा असा वेगळा दृष्टिकोन हाच एक आशेचा किरण असतो. की आपण यावर काम करुयात.. न जाणो आपल्याला फार वेगळी भूमिका, चित्रपट वाटय़ाला येईल, अशी आशा वाटत असते. हे उद्गार बॉलिवूडवर चार दशकं गारूड करून असलेल्या ‘अमिताभ बच्चन’ यांच्याकडून ऐकल्यानंतर कलाकारांची सर्जनशील भूक मोठी असते, याचं प्रत्यंतर आल्याशिवाय राहात नाही.
एकीकडे चित्रपट, रिअॅलिटी शो यांतून व्यग्र असतानाही दररोज न चुकता प्रेक्षकांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधण्याच्या त्यांच्या हट्टाबद्दल विचारल्यावर दिग्दर्शक असेल नाहीतर कलाकार असेल त्यांनी जनतेचा आवाज ऐकत राहिला पाहिजे, असा विचार त्यांनी आग्रहाने मांडला. सोशल मीडिया असं एक तंत्र आहे ज्याच्या माध्यमातून लोकांचे विचार ऐकता येतात. त्यांना समजून घेता येतं. पहिलं असं नव्हतं. ज्यामुळे आम्हाला कळू शके ल की आपले चाहते आपल्याबद्दल काय विचार करतात. आम्हाला चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळायचं की त्यांच्या मनात काय चाललंय. त्यांना चित्रपट आवडला असेल तर चित्रपट दीर्घकाळ चालायचा नाहीतर काही नाही. आमच्याकडे हे एकच उदाहरण असायचं ज्यातून चित्रपट चालला आहे की नाही हे कळायचं. आता तसं नाही आहे, ते स्पष्ट करून सांगतात. कुठे ना कुठेतरी मी हे मानत आलो आहे की जनतेचा आवाज ऐकत राहिला पाहिजे. तेच आम्हाला बनवतात. त्यांच्यापासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवून पुढे जात राहायचं तो काळ आता निघून गेला. आता इथून बाहेर पडलो तर ३ कोटी कॅमेरे तुमचा वेध घेत असतात. तुम्ही काय करता, कसे वागता, काय बोलता सगळंच टिपलं जातं. मग काय लपवून ठेवायचं त्यापेक्षा आपणच मोकळेपणे बोलूनच घेऊयात.. असं ते दिलखुलासपणे सांगतात.
‘शमिताभ’ची कथा आपल्यासाठी खास आहे, पण त्याच्याविषयी तपशिलात बोलता येणार नाही. मी आणि धनुष दोन अगदी भिन्न व्यक्ती. आमच्या दोघांमध्येही एकेक उणिवा आहेत. एकमेकांच्या मदतीने त्या उणिवा भरून काढून आम्ही पुढे जातो. एकमेकांसाठी आधारभूत झालेले आम्ही दोघं यशही मिळवतो. मात्र, कालांतराने आमच्यात मतभेदाची ठिणगी पडते. अहं जागा होतो आणि या युद्धात काय होतं ते.. पुढचं उत्तर आपल्याला चित्रपटात शोधायचं आहे हे सुज्ञ वाचकांस सांगणे न लगे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा