पत्नी एश्वर्यावर अद्याप छाप पाडण्यात यश आले नसल्याची प्रांजळ कबुली अभिनेता धनुषने दिली. एश्वर्या ही सुप्रसिध्द अभिनेते रजनिकांत यांची मुलगी आहे. अभिनेता रजनिकांत आणि त्यांच्या मुलीवर कशाप्रकारे छाप पाडतोस असा प्रश्न विचारला असता, अद्याप आपण एश्वर्यावर छाप पाडण्याचा प्रयत्न करत असल्याची कबुली त्याने दिली. रजनिकांत यांचे मन जिंकण्यासाठी तुमच्यातला प्रामाणिकपणा आणि साधेपणा पुरेसा आहे. असे असले तरी, पत्नी एश्वर्याला मात्र धनुषचा खूप अभिमान आहे.
‘शमिताभ’ या आगामी चित्रपटात धनुष आणि अमिताभ बच्चन ही जोडी दिसणार आहे. बच्चन यांच्यासोबतच्या कामाचा अनुभव कथन करताना धनुष म्हणाला, त्यांच्यासोबत काम करताना खूप काही शिकायला मिळाले. एका पुरस्कार सोहळ्यात पहिल्यांदा मी त्यांना भेटलो. त्यानंतर चित्रपटाच्या सेटवर आमची भेट झाली. सेटवर त्यांच्या सहज वावरण्याने तुमच्यावरील दडपण नाहीसे होते. त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव रोमांचित करणारा होता. आर. बाल्कि दिग्दर्शित ‘शमिताभ’ चित्रपटात कमल हसनची मुलगी अक्षरा हसनदेखील प्रमुख भूमिकेत आहे.
पत्नी एश्वर्यावर छाप पाडण्यात अपयशी – धनुष
अद्याप पत्नी एश्वर्यावर छाप पाडण्यात यश आले नसल्याची प्रांजळ कबुली अभिनेता धनुषलाने दिली आहे. एश्वर्या ही सुप्रसिध्द अभिनेते रजनिकांत यांची मुलगी आहे.
First published on: 16-01-2015 at 12:45 IST
TOPICSधनुषDhanushबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजनManoranjanशमिताभहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 4 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am still trying to impress my wife says dhanush