पत्नी एश्वर्यावर अद्याप छाप पाडण्यात यश आले नसल्याची प्रांजळ कबुली अभिनेता धनुषने दिली. एश्वर्या ही सुप्रसिध्द अभिनेते रजनिकांत यांची मुलगी आहे. अभिनेता रजनिकांत आणि त्यांच्या मुलीवर कशाप्रकारे छाप पाडतोस असा प्रश्न विचारला असता, अद्याप आपण एश्वर्यावर छाप पाडण्याचा प्रयत्न करत असल्याची कबुली त्याने दिली. रजनिकांत यांचे मन जिंकण्यासाठी तुमच्यातला प्रामाणिकपणा आणि साधेपणा पुरेसा आहे. असे असले तरी, पत्नी एश्वर्याला मात्र धनुषचा खूप अभिमान आहे.
‘शमिताभ’ या आगामी चित्रपटात धनुष आणि अमिताभ बच्चन ही जोडी दिसणार आहे. बच्चन यांच्यासोबतच्या कामाचा अनुभव कथन करताना धनुष म्हणाला, त्यांच्यासोबत काम करताना खूप काही शिकायला मिळाले. एका पुरस्कार सोहळ्यात पहिल्यांदा मी त्यांना भेटलो. त्यानंतर चित्रपटाच्या सेटवर आमची भेट झाली. सेटवर त्यांच्या सहज वावरण्याने तुमच्यावरील दडपण नाहीसे होते. त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव रोमांचित करणारा होता. आर. बाल्कि दिग्दर्शित ‘शमिताभ’ चित्रपटात कमल हसनची मुलगी अक्षरा हसनदेखील प्रमुख भूमिकेत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा