पती सैफ अली खानसोबतच्या आपल्या चित्रपटांना लोकांची पसंती न मिळाल्याने करिनाला आश्चर्य वाटते. मात्र याने ती अजिबात दु:खी नाही.
आपल्या आगामी ‘गोरी तेरे प्यार में’ च्या प्रचारासाठी इंदौरमध्ये आलेल्या करीनाने ही खंत व्यक्त केली. ती म्हणाली की, आमच्या दोघांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करू शकले नाहीत, याचे नेमके कारण मला सांगता येणार नाही. मात्र याचे नवल नक्कीच वाटते. मात्र त्याचे दु:ख मला अजिबात वाटत नाही, कारण खर्या आयुष्यात सैफ माझा हीरो आहे आणि राहील.
पुढे ती म्हणाली की, १९९० च्या काळातील अभिनेत्रींना आजच्या अभिनेत्रींप्रमाणे भूमिका मिळत नव्हत्या. आज त्यांच्याकडे जास्त पर्याय आहेत. शिवाय ही पुरुषप्रधान चित्रपटसृष्टी आहे, तरीसुद्धा चांगल्या भूमिका निवडणे अभिनेत्रींच्या हाती असते. करीना आणि सैफचा २००८ मध्ये ‘टशन’ चित्रपट आला होता. या चित्रपटानंतरच त्यांची जवळीक वाढली आणि गेल्यावर्षी हे दोघेही विवाहबंधनात अडकले. आतापर्यंत दोघांनी ‘एलओसी कारगिल’, ‘ओमकारा’, ‘रोड साइड रोमिया’, ‘कुर्बान’, ‘एजंट विनोद’ हे चित्रपट एकत्र केले आहेत.
सैफसोबतचे चित्रपट न चालल्याचे आश्चर्य वाटते – करिना
पती सैफ अली खानसोबतच्या आपल्या चित्रपटांना लोकांची पसंती न मिळाल्याने करिनाला आश्चर्य वाटते.
First published on: 12-11-2013 at 11:43 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am surprised that my movies with saif flopped kareena kapoor