११ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या ‘भूतनाथ रिटर्न्स’ या अमिताभ बच्चन यांचा अभिनय असलेल्या चित्रपटाने केवळ पाच दिवसात २५.४४ कोटीचा धांदा केला असल्याचा दावा या चित्रपटाच्या यशानिमित्त ठेवण्यात आलेल्या पार्टीदरम्यान चित्रपटकर्त्यांनी केला. चित्रपटात भूतनाथची प्रमुख व्यक्तिरेखा साकारणारे आणि या पार्टीला उपस्थित असलेले अमिताभ बच्चन म्हणाले, जेव्हा आम्ही या चित्रपटाचे प्रमोशन करत होतो, तेव्हा दिग्दर्शक अथवा आमच्या कोणासाठी नव्हे, तर निर्माता रवि चोप्रांसाठी हा चित्रपट चालावा असे मी म्हटले होते. देवाने आमची प्रार्थना ऐकली, त्यासाठी मी देवाचे आभार मानतो. रवि चोप्रा घरी आहेत. चित्रपटाच्या यशाची गोड बातमी ऐकून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल अशी मला आशा आहे. ‘भूतनाथ रिटर्न्स’ चित्रपटाची निर्मिती ‘टी-सिरिज’ आणि ‘बीआर फिल्म्स’ यांनी संयुक्तरित्या केली आहे. कपिल व अभय या आपल्या मुलांसह निर्माता रवि चोप्राचीं पत्नी रेणू पार्टीला उपस्थित होती. काही काळापासून फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रवी चोप्रांवर औषधोपचार सुरू असून, त्यांचे कुटुंबिय अर्थिक संकटाशी सामना करत आहे. २००८ सालच्या ‘भूतनाथ’ चित्रपटाचा सिक्वल असलेल्या ‘भूतनाथ रिटर्न्स’ या विनोदी-भयपाटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांचे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा