चित्रपट अभिनेता रणवीर सिंह तुलना आणि स्पर्धेमध्ये विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्यावर जास्त विश्वास ठेवतो. लुटेरा चित्रपटाच्या प्रसिध्दी कार्यक्रमात वार्ताहरांशी बोलताना रणवीर म्हणाला, मी स्पर्धेवर विश्वास ठेवत नाही. लोक माझी तुलना करू शकतात, परंतु मी इतर कोणाशी स्पर्धा किंवा तुलना करू शकत नाही. माझी स्पर्धा स्वत:शीच असून, मी व्यक्तिमत्व विकासासाठी खूप मेहनत घेतो. प्रत्येकजण आपले काम करत असून प्रत्येकजण महान आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवानी याचे असून, यात रणवीर आणि सोनाक्षीच्या प्रमुख भूमिका आहेत. रणवीर म्हणाला, एका पिरियॉडीक चित्रपटात काम करणे खूप मजेशीर असते, कारण यासाठी एका विशिष्ट काळाची निर्मिती केली जाते. मला १९५० च्या दशकाची कोणती ही माहिती नसताना अशावेळी त्या काळातली व्यक्तिरेखा उभी करणे माझ्यासाठी खूप मजेशीर होते. मी हा चित्रपट पाहिला असून मी खूप खूश आहे. या चित्रपटाविषयी मी अतिशय उत्साही असून लोकांनी हा चित्रपट पाहण्याची वाट पाहात आहे.
लुटेरा चित्रपटातील बिगर दाढी आणि मिशीवाला रणवीर चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात मात्र दाढी आणि मिशीत नजरेस पडत आहे. रणवीरने ‘राम लीला’ या त्याच्या आगामी चित्रपटासाठी दाढी आणि मिशी वाढवली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा