‘रोमान्सचा बादशाह’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरूख खानबरोबर प्रियांकाने ‘डॉन’ आणि ‘डॉन २’ चित्रपटात काम केले आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये त्यांची ‘ऑनस्क्रीन कॅमेस्ट्री’सुद्धा चांगली जुळून आलेली दिसते. असे असले तरी आपण कोणाबरोबरही रोमान्सचे दृष्य तितक्याच चांगल्या प्रकारे चित्रीत करू शकतो, असे प्रियांकाचे म्हणणे आहे. रोमान्ससाठी शाहरूख हा उत्तम सहकलाकार असल्याचे वाटते का, असा प्रश्न फिल्मफेअर पारितोषिक वितरण समारंभाच्या वार्ताहर परिषदेत आलेल्या प्रियांकाला विचारला असता ती म्हणाली, “मी कोणाबरोबरही रोमान्सची दृष्ये साकारू शकते, फक्त शाहरूखच का… हे माझे कामच आहे.” वाहतूक कोंडीमुळे या वार्ताहर परिषदेत पोहोचण्यास प्रियांकाला उशीर झाल्याने, संध्याकाळी साडेसातला सुरू होणारी वार्ताहार परिषद रात्री नऊ वाजता सुरू झाली. वार्ताहार परिषदेत येण्यास उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत प्रियांका म्हणाली, या आधी देखील अनेक कार्यक्रमात पोहोचण्यासाठी मला उशीर झाला आहे. असे होणे हे माझ्या मानसिकतेवर अवलंबून नाही. मी एका चित्रपटाचे चित्रीकरण करत होते आणि वाहतूक कोंडीमध्ये अडकल्यामुळे उशीर झाल्याचे ती म्हणाली. काम आणि वाहतुकीमुळे उशीरा न पोहोचण्याचा नववर्षासाठी केलेला संकल्पदेखील मोडल्याचे तिने यावेळी कबुल केले. यश राज फिल्म स्टुडिओत २४ जानेवारीला फिल्मफेअर पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा