‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातून बॉलीवूडची आघाडीची जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र झळकेल. या दोघांचे प्रेम दिवसेंदिवस बहरतानाचं दिसत आहे. नुकताचं दीपिका आणि रणबीर कपूरचा ‘तमाशा’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीला रणवीरनेही हजेरी लावली होती. यावेळी दीपिकाने रणवीरचे चुंबन घेतले होते. तेव्हापासून #bestboyfriend हा टॅग सोशल मिडियावर चालत होता.
.. आणि दीपिकाने घेतले रणवीरचे चुंबन
बेस्ट बॉयफ्रेण्डचा टॅग तू जिंकला आहेस असे विचारले असता रणवीर हसत म्हणाला की, त्यासाठी मी पात्र आहेच. रणवीरच्या या उत्तराने त्याच्या आणि दीपिकाच्या नात्याला अधिकृत पावती मिळाल्याचे म्हणावयास हरकत नाही. आता दीपिका तिच्या या बेस्ट बॉयफ्रेण्डविषयी कधी बोलतेय ते बघू.

Story img Loader