अभिनेता आणि निर्देशक फरहान अख्तरची मोठी फॅन असल्यामुळे अभिनेत्री सोनम कपूरने भाग मिल्खा भाग चित्रपटातील छोटी भूमिका स्वीकारल्याचे सांगितले. सोनम म्हणाली की, प्रसून जोशीने खूप चांगली पटकथा लिहीली असून ती वाचल्यावर मला रडू कोसळले. चित्रपटात मी काही फार मोठी भूमिका केलेली नाही. पण राकेश ओमप्रकाश मेहरा आणि फरहान अख्तरसोबत काम करण्याची माझी इच्छा असल्यामुळे ही भूमिका मी स्वीकारली. या चित्रपटाकरिता तिने फरहानसोबत २० दिवस शूटींग केले आहे. कोणत्याही चित्रपटात काम करण्यापेक्षा एखाद्या चांगल्या चित्रपटात छोटीशी भूमिका करणे केव्हाही चांगले, असेही सोनम म्हणाली. भाग मिल्खा भाग हा चित्रपट महान धावपटू मिल्खा सिंह यांच्या जीवनावर आधारित आहे.
सोनमचा नुकताच रांझना हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याच्या बॉक्स ऑफीसवरील यशामुळे ती खूष आहे.

Story img Loader