भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण भारतात शोककळा पसरली आहे. लता मंगेशकर यांनी सगळ्यांची मने जिंकली होती. लता यांचे अनेक जुने व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लता यांच्या एका मुलाखतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यावेळी त्यांनी एक मुलाखत दिली होती. यावेळी त्यांना “पुन्हा जन्म मिळाला तर लता मंगेशकर म्हणून आवडले का?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर लता दीदी म्हणाल्या, “मला आधी पण असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा मी जे उत्तर दिलं होतं तेच देईन, मला पुनर्जन्म मिळू नये आणि मिळालाच तर मला लता मंगेशकर व्हायचं नाहीये.” मुलाखत कारणाने का असं असा प्रश्न विचारता, लता दीदी हसत म्हणाल्या, “लता मंगेशकर असल्याच्या ज्या अडचणी किंवा समस्या आहेत त्या तिलाच माहित आहेत.” सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Lata Mangeshkar : “मी फक्त लता मंगेशकर यांना ओळखतो”, पाकिस्तानमध्ये सुनील गावस्कर यांनी घेतला होता अपमानाचा बदला

लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाची लागण झाली होती. त्यासोबत त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचं समोर आलं होतं. लता मंगेशकर यांना करोनाची सौम्य लक्षण जाणवत होती. त्यामुळे त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. त्यानंतर त्यांची प्रकृती खालवली.

PHOTOS: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याविषयी ‘या’ गोष्टी माहितीये का?

दरम्यान, १९४२ मध्ये लता मंगेशकर १३ वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यानंतर १९४५ मध्ये दीदी आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत मुंबईत आल्या. त्यांनी उस्ताद अमानत अली खान यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे धडे गिरवले. त्यानंतर १९४६ मध्ये ‘आपकी सेवा में’ या सिनेमात ‘पा लागूं कर जोरी’ हे गाणे गायले.

आणखी वाचा : धोनीच्या खूप मोठ्या चाहत्या होत्या लता मंगेशकर; निवृत्तीची बातमी ऐकताच केली होती विनंती

आणखी वाचा : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं खरं नाव माहितीये का?

लता मंगेशकर यांची कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती. त्यांनी ९०० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली होती. तसेच २० पेक्षा जास्त प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले होते. लता मंगेशकर यांचे संपूर्ण कुटुंबच संगीतासाठी प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I do not want to be born again as lata mangeshkar her old interview went viral dcp