तैमूरबाबत करीना कपूरने केलेले एक वक्तव्य आता समोर आले आहे. तैमूरने आधी त्याचे शिक्षण पूर्ण करावे आणि मगच त्याचे करीअर निवडावे अशी इच्छा करीना कपूरने व्यक्त केली आहे. मला पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करता आले नाही त्याची खंत मला आजही आहे. मात्र माझा मुलगा तैमूरच्या बाबतीत मात्र असे होऊ नये असे मला वाटते आहे असेही करीना कपूरने म्हटले आहे.

मी वयाच्या १७ व्या वर्षी सिनेमात काम करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मला शिक्षण अर्धवट सोडावे लागले. मला अभिनेत्री व्हायचे होते. माझ्या आवडीचे क्षेत्र होते त्यामुळे मी या सिनेक्षेत्रात उडी घेतली. मात्र आज मागे वळून पाहताना असे वाटते आहे की मी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करायला हवे. तैमूरबाबत मला कोणी विचारले तर मी हेच सांगेन की त्याने आधी त्याचे शिक्षण पूर्ण करावे असे मला वाटते आहे.पिंक व्हिलाने या संदर्भातले वृत्त दिले असून, एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत करीनाने हे वक्तव्य केल्याचे समजते आहे.

Story img Loader