बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या ‘मॅडमजी’ चित्रपटाच्या निर्मितीत गुंतली आहे. एक निर्माता म्हणून निर्णय घेण्याचा आनंद सध्या मी उपभोगत आहे, असे प्रियांका म्हणाली. ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘दिल धडकने दो’ या चित्रपटांचे लागोपाठ शूटींग करण्यातही प्रियांका सध्या व्यस्त आहे.
प्रियांका म्हणाली की, ‘मॅडमजी’ ही एक काल्पनिक कथा आहे. एका आयटम गर्लला राजकारणात कसे खेचले जाते हे यात चित्रीत करण्यात येत आहे. हा चित्रपट महिला सशक्तीकरणावर आधारित आहे. मी एक निर्माता म्हणून ऑफिसमध्ये बसून निर्णय घेण्याचा आनंद उपभोगत आहे. यादरम्यान, मी चित्रपटाच्या सेटवर अशा काही सहायक दिग्दर्शकांची भेट घेतली ज्यांच्याकडे चांगल्या पटकथा आहेत पण ते सादर करण्याची संधी त्यांना मिळालीच नाही. माझ्याकडे मोठ्या बजेटचा चित्रपट बनवण्याची क्षमता नाही. पण, काही महान व्यक्तिंसोबत मी कमी बजेटच्या चित्रपटांचे निर्मिती करेन, असेही ती म्हणाली. प्रियांकाच्या निर्मिती संस्थेचे नाव ‘पेबल पिक्चर्स’ असे आहे.

Story img Loader