बॉलीवूड बादशहा शाहरुख खानचा फॅन चित्रपट तिकीट बारीवर फारशी काही चांगली कमाल दाखवू शकला नाही. पण, चित्रपटातील त्याच्या कामाची सर्वांकडून प्रशंसा केली गेली. फॅन चित्रपटाचा दिग्दर्शक मनीष शर्मा याने नुकतेचं शाहरुखला या चित्रपटाकरिता राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले गेले पाहिजे होते असे म्हटलेयं.
मनीष म्हणाला की, चित्रपटात शाहरुखने केलेल्या कामासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार दिला जाईल अशी मला खरंच अपेक्षा होती. भविष्यात त्याला हा पुरस्कार मिळेल अशी आशा करुया. चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहून शाहरुख आणि आमची संपूर्ण टीम आनंदी आहे. हे समाधानकारक आहे. आम्ही इतर दिग्दर्शक, कलाकार, निर्माते यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं केलं याचा आम्हाला आनंद आहे.
फॅन या चित्रपटात शाहरुखने दुहेरी भूमिका साकारली होती. सुपरस्टार आर्यन खन्ना आणि त्याचा चाहता गौरव या दोन भूमिका त्याने चित्रपटात केल्या होत्या.

Story img Loader