अनेक कलाकारांना त्यांच्या उमेदीच्या काळात कास्टिंग काऊचला सामोरे जावे लागते. यासंबंधी काहीजण खुलून बोलतात तर काही यावर बोलणे टाळतात. पण आपण या घटनेला सामोरं गेल्याचा खुलासा बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगने केला आहे.
एका मुलाखतीदरम्यान कास्टिंग काऊचबाबत चर्चा करताना रणवीरने त्याला आलेल्या अनुभवाबाबत सांगितले. रणवीर म्हणाला की, माझ्या करिअरची मी नुकतीच सुरुवात करत होतो. त्यावेळी मला कास्टिंग काऊचला सामोरं जाव लागल होत. पण करिअरच्या सुरुवातील अनेकांना असे अनुभव येतातच. मला एका दिग्दर्शकाने रात्री आठ वाजता अंधेरी येथील त्याच्या राहत्या घरी बोलावले होते. मी ठरलेल्या वेळी पोर्टफोलियो घेऊन तिथे पोहोचलो. परंतु त्याने पोर्टफोलियो न पाहता तो बाजूला ठेवला. त्यानंतर माझ्याकडे बघत तो म्हणाला, या शोबीझच्या दुनियेत पुढे जाण्यासाठी तुला स्मार्ट आणि सेक्सी बनण्याची गरज आहे. त्यानंतर तो अधिकच खोलवर जाऊन बोलू लागला. तू समोरच्याला स्पर्श करू देण्यासाठी नेहमी मोकळ असायला हवे. त्याला माझ्याकडून असलेल्या अपेक्षा मला कळताच मी त्याला नकार दिला. पण त्यानंतर तो माझ्याशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करू लागला. मी तुला काही करणार नाही फक्त हात लावेन किंवा बघेन. यानंतर तर माझी त्याच्याविषयीची शंकाच दूर झाली आणि मी त्याला सरळ ‘नाही’ असे म्हटले. त्यावर अगदी आपल्या प्रियकराने दुखावल्याच्या भावना त्याच्या चेह-यावर होत्या. मी यासंबंधी इतर नवीन मुलांशी बोललो तर त्यांनाही सदर दिग्दर्शकासोबत तोच अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले.
कास्टिंग काऊच हे अभिनय क्षेत्रातील सत्य असल्याचेही रणवीर शेवटी म्हणाला.