आपल्या भूमिका जगण्याचा एक नवा सोस बॉलिवूडच्या बहुतांशी सगळ्याच कलाकारांना असतो. आपण जी व्यक्तिरेखा साकारतो आहोत तसे दिसण्याचा, तसे वागण्याचा कोण आटापिटा हे कलाकार करीत असतात. या तथाकथित परफेक्शनच्या हट्टापायी कलाकारांना काय-काय करावे लागते. ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये रॅम्पवर उतरलेल्या प्रियांकाने आपल्या या भावनांना वाट मोकळी करून दिली. बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोमच्या आयुष्यावर आधारित चित्रपट करता करता माझ्यातली मुलगी हरवली आहे, मी मुलगाच होऊन बसले आहे की काय, असे वाटू लागल्याचे प्रियांकाने जाहीरपणे सांगितले.
प्रियांकाला या चित्रपटात मेरी कोमसारखे दिसण्यापासून ते तिच्यासारखे असण्यापर्यंत तिला चांगलीच मेहनत घ्यावी लागली आहे. चमचमीत खाणे, मेकअप, स्टाईलिंग या सगळ्या मुलींच्या म्हणून गोष्टींना काट मारायला लागणे ही एक गोष्ट समजून घेता येईल. पण, मेरी कोम बॉक्सर असल्यामुळे तो खेळगुण साकारायचा तर जीवतोड व्यायाम, मेहनत तिला करावी लागली आहे. या सगळ्याची आठवण प्रियांकाला फॅशन डिझाईनर नीता लुल्ला यांचा बेज रंगाचा काफ्तान परिधान करून, नटून थटून रॅम्पवर उतरली तेव्हा झाली आणि तिला बोलल्याशिवाय राहवले नाही. मागे कधीतरी ‘मेरी कोम’ करता करता मी मुलगाच झाले आहे की काय असे तिने म्हटले होते. त्याचीच री ओढत आता नटून-थटून लोकांसमोर येताना काय वाटतेय, असा प्रश्न तिला विचारला गेला.
तेव्हा कोणी कितीही प्रयत्न केला तरी माझ्यातली स्त्रीसुलभ नजाकत माझ्याकडून काढून घेणे अशक्य आहे, असे ती पहिल्यांदा बोलून गेली. पण, मेरी कोम करताना या स्त्रीसुलभ हौसेला, नटण्यामुरडण्याला चांगलीच काट मारावी लागली होती आणि त्यामुळे मन अस्वस्थ होते, एक बेचैनी मनात होती, हेही तिने कबूल केले. रॅम्पवॉकसाठी म्हणून मेकअप केल्यानंतर आरशात स्वत:चा चेहरा बघितला आणि हरखून गेल्याचे तिने सांगितले. आपण इतके सुंदर दिसू शकतो हेच जणू आपण विसरून गेलो होतो, असे तिने सांगितले. पण, रॅम्पवॉकच्या निमित्ताने पुन्हा एकदा मला प्रियांका जगता आली आणि त्याचा जो म्हणून आनंद होता ना तोच उपस्थितांनाही रॅम्पवर अनुभवता आला असेल, असेही ती पुढे म्हणाली. नीता लुल्लाच्या शोसाठी ‘शोस्टॉपर’ ठरलेल्या प्रियांकाला हेही मनोमन माहिती आहे की शेवटी रॅम्पवरची ही छानछौकी काही मिनिटांची असते. शेवटी अभिनेत्री म्हणून नाव कमवायचे असेल तर ‘मेरी कोम’सारख्या थकायला लावणाऱ्या चित्रपटांना पर्याय नाही.
‘मेरी कोम’ करता करता मी जणू मुलगाच झाले होते
आपल्या भूमिका जगण्याचा एक नवा सोस बॉलिवूडच्या बहुतांशी सगळ्याच कलाकारांना असतो. आपण जी व्यक्तिरेखा साकारतो आहोत तसे दिसण्याचा,
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-03-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I feel like a boy after playing mary kom role priyanka chopra